Aerial Advertising: कॅनरा बँकेतर्फे मुंबईत पहिल्यांदाच हवाई जाहिरातीचे प्रदर्शन, जमिनीपासून 1000 फूटांवर केली जाहिरात
Canara Bank

कॅनरा बँकेतर्फे (Canara Bank) पहिली वहिली हवाई जाहिरात (Aerial advertising) मुंबईमध्ये 16 एप्रिलला एका विमानातर्फे प्रदर्शित करण्यात आली. या हवाई जाहिरातीचा कालावधी साधारण दोन तासांचा होता. यासाठीचे विमान हे जमिनीपासून 1000 फूट तर समुद्र सपाटीपासून 500 फूट अंतरावर ताशी 60 मैल वेगाने उडविण्यात आले. एरियल अॅडव्हर्टाईजमेंट एअरक्राफ्ट (Aerial Advertising Aircraft) आता मुंबईत उपलब्ध आहे. पूर्व-निर्धारित मार्गानुसार मुंबई शहरावर एरियल जाहिराती दाखवतात. कोणत्याही बँकेने एरियल जाहिरातीद्वारे त्यांच्या ब्रँडचा प्रचार करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ग्राहक सेवा केंद्रित बँक म्हणून प्रसिद्ध असलेल्या कॅनरा बँकेची स्थापना द्रष्टे दानशूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमिम बाल सुब्बराव पै यांनी कर्नाटकातील छोटेसे बंदर मेंगलोर येथे 1906 साली केली होती. कॅनरा बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक आहे. शतकभराच्या प्रवासामध्ये ही बँक विविध बदलांमधून गेलेली असून आजही आपले ठाम अस्तित्व टिकवून आहे. हेही वाचा Mumbai: आदित्य ठाकरें यानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सह गिरगाव चौपाटी व्ह्यूइंग डेकचे केले अनावरण

विशेष करून 1969 च्या राष्ट्रीयकरणाच्या लाटेनंतरही या बँकेने आपला भौगोलिक विस्तार कायम राखत देशभरात ग्राहक पेठ काबीज केली. 2006 साली बँकेने आर्थिक क्षेत्रामध्ये आपली शतकभराची कारकीर्द पूर्ण केली. या प्रवासामध्ये बँकेने अनेक मैलाचे दगड पार केले. आजही भारतीय अर्थकारणामध्ये कॅनरा बँक आपले विशेष स्थान टिकवून आहे.