Mumbai Shocker: मुंबईत लोकप्रिय स्ट्रीट फूडमध्ये वडापाव फेमस आहे. मात्र, त्यानंतर पाणीपुरी, भेळपुरीचा नंबर लागतो. मालाड भागात मोफत ‘भेळपुरी’ देण्यावरून दोघांनी एका भेळपुरी विक्रेत्याला मारहाण (Attack)केल्याची घटना घडली. दोघांनी भेळपुरी विक्रेत्याला(Bhelpuri Seller) भेळपुरी मोफत देण्यास सांगितले. मात्र, त्यावर विक्रेत्याने नकार दिला. त्याशिवाय, त्यांचे आधीचे उधारीचे पैसे देण्यास सांगितले. त्यावर संतापलेल्या दोघांनी भेळपुरी विक्रेत्याला मारहाण (Mumbai Crime)केली. (हेही वाचा: Shimla Fruit Market Video: फळ विक्रेत्यांमध्ये जोरदार हाणामारी, शिमला फ्रूट मार्केटमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)
'भेळपुरी' मोफत देण्यास नकार दिल्याने दोन जणांनी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात 18 वर्षीय विक्रेता गंभीर जखमी झाला. मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत संतापलेल्या दोघांनी आधी त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर जवळच पडलेला लोखंडी रॉडने मारहाण केली. मारहाणी विरोधात भेळपुरी विक्रेत्याने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर मंगळवारी ही घटना उघड झाली.
रागाच्या भरात आरोपींनी जवळच पडलेला लोखंडी रॉड उचलला आणि विक्रेत्यावर हल्ला केला. त्यामुळे त्याच्या हाताला दुखापत झाली. शेजारी असणाऱ्या लोकांनी विक्रेत्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.