महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावासामुळे (Maharashtra Rain Update) अनेक जिल्ह्यांमध्ये पूरजन्य स्थिती (Flood Situation in Maharashtra) निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या मदत आणि बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) पुढे सरसावले आहे. एनडीआरएफची नऊ पथके महाराष्ट्रात तैनात करण्यात आली आहेत. यातील चार पथके मुंबईत तर इतर काही पथके राज्याच्या विविध भागांमध्ये पोहोचविण्यात आली आहेत. बुधवारपासून (21 जुलै) अनेक भागांमध्ये सुरु झालेला संततधार पाऊस आजही (गुरुवार, 22 जुलै) सुरुच आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा विविध ठिकाणी पवसाचा जोरदार फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.
एनडीआरएफकडून देण्यात आलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की त्यांची चार पथके मुंबईत, आणि प्रत्येकी एक टीम ठाणे, पालघर आणि इतर जिल्ह्यांमध्ये दाखल आहेत. एक पथक आज दुपारी चिपळूनला रवाना झाली आहे. दोन पथके कोल्हापूरला पाठविण्यात आली आहेत. यातील एक पथक शिरोळ जिल्ह्यात आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी काम करेन तर एक कोल्हापूर शहरात थांबेन. (हेही वाचा, Maharashtra Rains Updates: कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पूरस्थिती, नद्यांनी ओलांडली धोक्याची पाणीपातळी)
एका स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, ठाण्यातील साहापूर तालुक्यात काही गावे पाण्यात गेली आहेत. त्यातील अनेक नागरिकांना एनडीआरएफच्या मदतीने बाहेर काढले आणि सुरक्षीत ठिकाणी दाखल केले. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा, भिवंडी आणि कसारा परिसरातही अधिक नागरिक अडकल्याची भीती आहे.