
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पुणे (Pune ) येथील ज्योतिराम बाबुराव मनसुळे नावाच्या फ्लिपकार्ट डिलिव्हरी बॉयला (Flipkart Delivery Boy) अटक केली आहे. तो 27 वर्षांचा आहे. अपरिचित महिलांना व्हिडिओ कॉल करुन त्यांच्यासोबत अश्लील हावाभाव, कृत्य केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. साधारण 40 महिलांसोबत आरोपीने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपीने इतरही महिलांशी असेच असभ्य वर्तन केले आहे काय, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, लोकप्रिय ई-कॉमर्स साइटच्या (e-commerce site डिलिव्हरी बॉयचे नाव ज्योतिराम बाबूराव मनसुळे असे आहे. तो महिलांशी व्हिडिओ कॉल करून असभ्य वर्तन करत असे. 27 वर्षीय तरुणाने किमान 40 महिलांना व्हिडिओ कॉल करून हा गुन्हा केला आहे. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी ज्योतिरामला पुण्यातून अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. (हेही वाचा, iPhone Price: नव्या वर्षात अॅपलच्या मोबाईलवर भन्नाट ऑफर! आयफोनवर तब्बल ३२ हजारांची सुट)
महिलांना व्हिडिओ कॉल करण्यासाठी ज्योतीराम सोशल मीडियाचा वापर करत असे. प्रामुख्याने फेसबुकवर नोकर भरतीच्या विविध पोस्ट पाहून ज्योतिराम विविध व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये प्रवेश करत असे. अशा ग्रपमधून तो नंबर गोळा करत असल्याची माहिती पुढे आली आहे. फेसबुकवरी व्हॉट्सअॅप ग्रुप हे ज्योतिरामचे महिलांचे फोन क्रमांक गोळा करण्याचा प्रमुख स्त्रोत होता.
महिलांच्या नंबरवर तोव्हिडिओ कॉल करायचा. व्हिडिओ कॉल आल्यावर स्क्रीनवर अश्लील व्हिडिओ दिसत होता. अशा प्रकारे तो दिवसेंदिवस त्याच्या लैंगिक कल्पना पूर्ण करायचा असेही पोलिसांनी सांगितले.. मुंबईतील मलाड येथील एका रहिवाशाने असा फोन आल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधला. त्यांच्या तक्रारीवरून ज्योतिरामला अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारी बोरिवली सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांच्या आदेशानुसार ज्योतिराम सध्या तुरुंगात आहेत.
ट्विट
Maharashtra | The 27-year-old Flipkart delivery agent who was arrested from Pune yesterday for video calling over 30 women & doing obscene acts, was identified as Jyotiram Baburao Mansule.
(Earlier information tweeted did not contain the name, information now updated)
— ANI (@ANI) February 20, 2023
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-वडिलांच्या मृत्यूनंतर ज्योतिराम आणि त्यांचे आजोबा पुण्यात राहू लागले. त्याने असा गुन्हा केला आहे, यावर त्याच्या अनेक नातेवाईकांचा विश्वास बसत नव्हता.