पुणे-लखनऊ विमानाने (Pune-Lucknow Flight) प्रवास करणाऱ्या 26 वर्षीय तरुणाला प्रवासादरम्यान हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आल्याची घटना घडली. यानंतर वैद्यकीय एमर्जन्सी लक्षात घेत या विमानाचे नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Nagpur Airport) आपत्कालीन लॅण्डिंग करण्यात आली. हार्ट अटॅक आलेल्या तरुणाचे नाव मोहम्मद अहेमद अन्सारी असे आहे. आज दुपारी ही घटना घडली. (हेही वाचा - Mumbai-Chennai IndiGo Flight Delay: को-पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याने चेन्नईहून मुंबईकडे जाणार्या इंडिगो फ्लाइटला 4 तासांचा विलंब; प्रवाशांमध्ये संताप)
इंडिगो एअरलाइन्सचे फ्लाइट क्रमांक 6E 338 या विमानात ही दुर्घटना घडली.
पुणे येथून लखनऊसाठी विमानाने उड्डाण भरले. प्रवास सुरू झाल्यानंतर काही वेळातच मोहम्मद अहेमद अन्सारी या तरुणाच्या छातीत दुखू लागले. त्याची प्रकृती लक्षात घेत. आपत्कालीन लॅण्डिंगसाठी नागपूर विमानतळाशी संपर्क साधण्यात आला.
विमानातळावर तैनात असलेल्या किम्स किंग्जवे रुग्णालयाच्या वैद्यकीय चमुने तरुणाची पाहणी करून तात्काळ रुग्णालयात भरती केले. सध्या तरुणावर उपचार हे सुरु आहे.