महाराष्ट्र येथील नाशिक जिल्ह्यात ट्रक चालकाचे संतुलन बिघडल्याने 5 जणांचा मृत्यू, 3 जखमी
Image used for Representational Purpose | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रातील (Maharashtra) नाशिक (Nashik) जिल्ह्यात एका ट्रक चालकाचे संतुलन बिघडल्याने 5 जणांना आपला जीव गमवावा लागला असून या दुर्घटनेत 3 जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी नाशिक- पुणे महागार्गावरील (Nashik-Pune Highway) सिन्नर येथून 25 किमी अंतरावर घडली आहे. जनावरांना चरण्यासाठी घेवून जाणाऱ्या तिघांचा यात मृत्यू झाला आहे. रस्त्यावरुन जनावरांना जाताना पाहिल्यानंतर ट्रक चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, चालकाचे संतुलन बिघडल्याने हा अपघात झाल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे.

नाशिक येथील अपघातामुळे स्थानिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या भीषण अपघातातील 5 जणांपैकी 3 जण स्थानिक होते. सिन्नर येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर येथे 25 किमी अंतरावर हा अपघात घडला आहे. अपघाताच्या वेळी स्थानिक लोक जनावरांना चरण्यासाठी घेवून जात होते. या दरम्यान ही दुर्देवी घटना घडली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी सांगितले की, ट्रक हा वेगाने धावत होता. यावेळी समोर गायींना रस्त्यावरुन जाताना ट्रक चालकाने पाहिले. यामुळे ट्रक चालकाने गाडी थांबण्याचा प्रयत्न केला. परंतु, चालकाचे संतुलन बिघडल्याने हा अपघात घडला आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. हे देखील वाचा- नांदेड येथे चार्टर विमान धावपट्टीवरुन घसरल्याने अपघात; मोठी दुर्घटना थोडक्यात टळली

या अपघतात जनावरांना चरण्यासाठी आलेल्या लोकांपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. तर त्याचवेळी मागून येणाऱ्या टेम्पोने ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहनांमधील एक-एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.