मान्सूनच्या (Rain) आगमनानंतर महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या दरम्यान राज्यातील मराठवाड्यात (Marathwada) वीज (Lightning strike) पडून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या जालना जिल्ह्यात तीन जणांना जीव गमवावा लागला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे दोन्ही जिल्हे महाराष्ट्रातील मराठवाड्यात आहेत. औरंगाबाद, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. मराठवाड्यात यंदा मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. पावसासोबतच ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटही सुरू होतो.
रायगडमधील श्रीवर्धनमध्ये सलग दोन दिवस वीज नाही. मुरुड तालुक्यातही 14 तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित होता. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जिल्ह्यातील पहिल्याच पावसाने महावितरणच्या दाव्याचा पुरता बोजवारा उडाला आहे. वीज नसल्याने नागरिकांचे हाल झाले. पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणातील बहुतांश भागात मान्सूनचे वारे वाहू लागले आहेत. हेही वाचा Child Labour Helpline: बालमजुरी रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइनची घोषणा, माहिती देणाऱ्याचे नाव ठेवणार गुप्त
IMD ने मुंबई, कोकण विभागासाठी रेड अलर्ट जारी केला. येत्या दोन दिवसात कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवस उर्वरित महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.वादळामुळे अनेक घरांची पडझड झाली. शिरीषपाडा येथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू झाला असून नुकसानीची तातडीने भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.