Mahadev Jankar Photo Credit: Twitter

राज्याचे दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्याकडे 50 कोटी रूपयांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. बारामतीतून या पाचही जणांना अटक करण्यात आली असून पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. डॉ. इंद्रजीत भिसे, सचिन पडळकर, दत्ता करे, तात्या कांरडे, विकास अलदर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

शेळी व मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब दोडतले (Babasaheb Dodtale) आणि जानकर यांच्या संभाषणाची क्लिप सोशल मीडियावरून व्हायरल करून त्यांची बदनामी करण्याची धमकी या ह्या आरोपींकडून करण्यात येत होती. तसेच ही संभाषणाची क्लिप व्हायरल न करण्यासाठी आरोपींनी 50 कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी केली होती. खंडणीची रक्कम न दिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती.

शरद पवार यांच्या विरोधात कमळ चिन्हावर माढा येथून लोकसभा मैदान मारण्याची महादेव जानकर यांची इच्छा

दरम्यान, तडजोड केल्यानंतर खंडणीची रक्कम 50 कोटींवरून 30 कोटी रूपये करण्यात आली. त्यानंतर या रकमेच्या पहिल्या हप्त्यासाठी 15 कोटी रूपये देण्याचे निश्चित झाले. ठरलेली रक्कम घेण्यासाठी आरोपी संबंधित स्थळी आल्यानंतर पोलिसांनी त्यांना सापळा रचून रंगेहात अटक केली. ह्यासंबंधी पुढील तपास सुरु आहे.