पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथे नुकत्याच आलेल्या ऍम्फान या चक्रीवादळातून देश सावरत असतानाच आता आणखी एक चक्रीवादळ हे धडकणार आहे. बंगालच्या उपसागरानंतर देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रात (Arabian Sea) हे चक्रीवादळ वादळ घोंगावत आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) रविवारी 31 मे रोजी याबाबत पुष्टी केली होती. अरबी समुद्र आणि लक्षद्वीप दरम्यान कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे. यामुळे येत्या 2-3 दिवसात महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी सीमेवर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र, गोवासह पश्चिम किनारपट्टीवर 4 जून पर्यंत मच्छिमारांना न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने (Ministry of Earth Science) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र किनारपट्टी व ईशान्य अरबी समुद्र, लक्षद्वीप क्षेत्र आणि केरळ किनारपट्टीवर मच्छिमाऱ्यांना न जाण्याचा इशारा दिला आहे.
'आग्नेय आणि लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्र व लक्षद्वीप भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पुढील 24 तासात पूर्व मध्य आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रात हे वादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील 24 तासात हे वादळ आणखी मजबूत होऊन त्यांचे रुपांतर चक्रीवादळात होऊ शकते. हे वादळ सध्या उत्तर दिशेने सरकत असून के 3 जूनपर्यंत उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर पोहोचण्याची शक्यता आहे.' असा इशारा हमावान खात्याकडून देण्यात आला आहे. हे देखील वाचा- Nisarga Cyclone Tracker: अरबी समुद्रात 3 जून पर्यंत तीव्र होणार चक्रीवादळ; पहा 'निसर्ग' चक्रीवादळाच्या प्रवासाच्या प्रत्येक दिवसाचे अंदाज
एएनआयचे ट्वीट-
Also, fishermen are advised not to venture into the eastcentral Arabian Sea along off Maharashtra coast & northeast Arabian Sea along & off Gujarat coast during 3rd–4th June: Ministry of Earth Science https://t.co/hocQ25k3cO
— ANI (@ANI) June 1, 2020
महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी या चक्रीवादळाचा अधिक धोका असल्याचे हवामान सांगण्यात आले आहे. ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून त्यामुले खवळलेला राहणार आहे. उंच लाटा किनाऱ्याला आदळतील. तसेच काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.