प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

मुंबईतील मांटुगा झोपडपट्टीला आग लागली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अग्निशामक दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवतहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.

आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून परिसरातील मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

दोन दिवसांपूर्वीच अंधेरीतील कामगार हॉस्पिटलला भीषण आग लागली होती. त्यात 8 जणांचा मृत्यू झाला तर 147 जण जखमी झाले. ही दुर्घटना ताजी असतानाच मुंबईत आगीची दुसरी घटना समोर आली आहे.