Hira Panna Mall Fire broke out: मुंबई येथील जोगेश्वरी, ओशिवारा येथील हिरा पन्ना मॉल परिसरात आग (Watch video)
Hira Panna Mall Jogeshwari | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

मुंबई येथील रहदारीचे आणि गर्दीचे ठिकाण असलल्या जोगेश्वरी येथील हिरा पन्ना मॉल (Hira Panna Mall Jogeshwari) परिसरात आग लागल्याची प्रथमिक माहिती पुढे येत आहे. ही आग ए श्रेणी-2 प्रकारात मोडणारी ही आग दुपारी तीनच्या सुमारास लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. आतापर्यंत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे कारण अद्याप पुढे आले नाही. आग लागल्याचे समजताच तातडीने इमारत खाली करण्यात आली आहे. आगीच्या ज्वाळा भडकत असून धुराचे लोट आकाशाकडे झेपावताना पाहायला मिळत आहे. या घटनेचे काही कथित व्हिडिओही सोशल मीडियावर खास करुन एक्सवर व्हायरल झाले आहेत.

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीची माहिती मिळताच नागरिकांनी इमारत रिकामी केल्याचे समजते. पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. आतापर्यंत यात कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. ही घटना ज्या ठिकाणी घडली ते ओशिवरा पोलीस ठाण्यांतर्गत येते.

ट्विट

व्हिडिओ

हाती आलेल्या ताज्या आणि अधिक माहितीनुसार, संपूर्ण परिसर धुराने भरला आहे. सर्वांना मॉल परिसरातून बाहेर काढण्यात आले आहे. मॉलजवळील रस्त्यावर लोकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे बघ्यांची संख्याही वाढल्याने परिसरात मोठी गर्दी जमली आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.