प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

Mumbai : मुंबईमधील आगीच्या सत्रातील पुढच्या आगीची बातमी मिळत आहे. आज दुपारी साधारण 1-1.30 च्या सुमारास कांदिवली (Kandivali) परिसरातील एका प्लास्टिक कारखान्यात ही आग लागली आहे. पाच फायर टेंडर घटनास्थळी पोहचले असून, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. कांदिवली पश्चिम मधील चारकोप नाका येथे सरकारी औद्योगिक इस्टेटमध्ये ही घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समजत आहे, मात्र अजूनतरी या आगीचे ठोस कारण मिळू शकले नाही. या आगीमध्ये आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, मुंबईमध्ये आग लागण्याचे प्रमाण हे गेल्या काही महिन्यापासून बरेच वाढले आहे. प्रशासनाने नियम व अटी लागू करूनही अनेक ठिकाणी आग प्रतिबंध उपाययोजना राबवण्यात आल्या नसल्याचे समोर येत आहे. नुकतीच चेंबूर परिसरात लागोपाठ काही दिवसांच्या अंतरावर दोनदा आग लागली होती. यातील एका आगीमध्ये तब्बल 5 जणांचा मृत्यू झाला होता.