Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

Famer Protest:  दिल्लीत केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या दीड महिन्यांहून अधिक दिवस आंदोलन सुरु आहे. अशातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी गाझीपूर येथील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी राऊत यांनी आंदोलक शेतकऱ्यांना आपला पाठिंबा असल्याचे ही त्यांनी म्हटले होते. तर आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवणारे एक खास ट्विट केले आहे.(Farmers Protest: 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार शेतकरी आंदोलन; राकेश टिकैत यांनी सरकारला दिला अल्टीमेटम)

संजय राऊत यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, गर्वाने म्हणा आपण सर्व आंदोलनजीवी आहोत. जय जवान, जय किसान! खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनजीवी या शब्दाचा उल्लेख केल्यानंतर संजय राऊत यांनी हे ट्विट केले आहे. (Farmers Protest: खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेना खासदारांचं शिष्टमंडळ गाझीपूर बॉर्डर वर राकेश टिकैत यांच्या भेटीला)

 Tweet:

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनजीवी हा शब्द वापरल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने यावर आक्षेप घेतला होता. मोर्चाने असे म्हटले  की, पंतप्रधानांकडून शेतकऱ्यांचा करण्यात आलेल्या अपमानाची आम्ही निंदा करतो. तर शेतकऱ्यांना पंतप्रधानांना सांगायचे आहे की, ते आंदोलनजीवीच होते ज्यांनी भारतात वसाहतीच्या राज्यकर्त्यांपासून मुक्त केले होते. त्यामुळेच आम्ही आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला गर्व आहे.

जर सरकार कडून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या गेल्यास तर ते आपल्या शेतात शेती करण्यास अत्यंत खुश असतील. परंतु सरकारची जी भुमिका आहे त्यामुळे आंदोलन अद्याप लांबले जात आहे. एमएसपीवर फक्त विधाने करुन कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही आहे. आधीसुद्धा अर्थहिन विधाने केली गेली आहेत.