Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र सरकाराच्या मंत्रालयात कथित रुपात फोन करुन स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार बोलत असल्याचा निनावी फोन आला होता. त्यावेळी एका अधिकाऱ्यासोबत बातचीत करणाऱ्या एका व्यक्तीसह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली आहे. त्यांनी असे म्हटले की, आरोपीने राजस्व विभागातील एका अधिकाऱ्याला फोन केला. त्याने शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करत अधिकाऱ्यांच्या बदल्यांबद्दल चर्चा केली. पोलिसांच्या एका अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, आरोपीने एका अॅपचा वापर केला असून त्याच्या माध्यमातून आवाज बदलला जाऊ शकतो.

पुढे असे सांगण्यात आले आहे की, अधिकाऱ्याच्या मोबाईलवर आलेला फोन हा शरद पवार यांच्या निवास स्थानावरुन आल्याचे सांगण्यात आले होते. अधिकाऱ्याला आवाज ऐकून संशय आल्याने त्याने पुन्हा शरद पवार यांच्या बंगल्यावर फोन केला.(शरद पवार यांच्या नावाने मंत्रालयात फोन; बदली संदर्भात आलेल्या 'त्या' कॉलमागे नेमका हेतू काय?)

Tweet:

पोलिसांनी असे म्हटले की, राजस्व अधिकाऱ्यांनी सांगितले पवार हे दिल्लीत आहेत. या घटनेसंदर्भात गावदेवी पोलीस स्थानकात बुधवारी रात्री भारतीय कलम 419 अंतर्गत गुन्हा दाखल केला. मुंबई गुन्हे शाखेचे एईसीने कडून सुद्धा यासंदर्भात तपास करत तीन जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर मुख्य आरोपीस त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. आरोपींच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी म्हटले की, आरोपींना एका कोर्टात हजर करण्यात आले. तेथे त्यांना 20 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.