देशभरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलला देशाला संबोधून केली. मात्र त्याच दिवशी महाराष्ट्रात कोरोना बाधितांची सर्वाधिक संख्या असलेल्या मुंबईत एक धक्कादायक घटना घडली. ज्यात बांद्रा रेल्वे स्थानकाबाहेर हजारोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केली. या सर्व कामगारांचा त्यांच्या मूळ गावी परत जायचे आहे अशी त्यांची मागणी होती. मात्र लॉकडाऊन असताना ही आणि पंतप्रधानांनी आदेश देऊनही मुंबईत इतका घोळका आला कुठून हा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यामुळे हे विरोधकांचे षड्.यंत्र असल्याचे राज्य सरकाकडून सांगण्यात आले. यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) झी 24 तास शी बोलताना विरोधकांवर आगपाखड केली आहे.
संकटाच्या काळातही विरोधकांनी एकत्र येऊन काम करण्याऐवजी राजकीय लाभासाठी वेगळी चूल मांडली आहे. मात्र, त्यांना याचा लाभ मिळणार नाही. त्यांचे बाप, आजी-आजोबा अशा 100 पिढ्या उतरल्या तरी उद्धव रिजाईन ही संकल्पना वास्तवात येणार नाही अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टिकास्त्र सोडले आहे.
संकटाच्या काळातही विरोधकांनी एकत्र येऊन काम करण्याऐवजी राजकीय लाभासाठी वेगळी चूल मांडली आहे. मात्र, त्यांना याचा लाभ मिळणार नाही. त्यांचे बाप, आजी-आजोबा अशा १०० पिढ्या उतरल्या तरी उद्धव रिजाईन ही संकल्पना वास्तवात येणार नाही. - @rautsanjay61 pic.twitter.com/gwMoFNWOg8
— Swapnil Ugale (@swapnilugale999) April 16, 2020
बांद्रे स्थानकाबाहेर घडलेली ही घटना राजकीय षडयंत्र असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले आहे. तर लॉकडाऊनच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येतात हे प्रशासनाचे अपयश म्हणावे लागेल, असे मत व्यक्त होत आहे. मात्र पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या गोष्टीसाठी केंद्र सरकारला जबाबदार ठरवले आहे.