Nitin Raut (Photo Credit: ANI)

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Denvendra Fadnavis) शुक्रवारपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. यामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस (Opration Lotus) राबवले जाणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राजस्थानात जे काही घडले त्यानंतर महाराष्ट्रातही ऑपरेशन कमळची चर्चा रंगली त्याबाबत उर्जामंत्री नितीन राऊत (Natin Raut) यांना विचारले असता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना भेटायला गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राज्यात शेवटी कटोरा घेऊन फिरावे लागेल. नागपूर शहर आणि ग्रामीण कायदा सुव्यवस्था येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले असताना नितीन राऊत म्हणाले आहेत. नितीन राऊत यांच्या टिकेला भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिल्लीत जाऊन देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळी या दोघांमध्ये बंद खोलीमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. त्यानंतर आज नागपूर शहर आणि ग्रामीण कायदा सुव्यवस्था येथील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखही हजर होते. उर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊतही हजर होते. त्यानंतर त्यांना ऑपरेशन लोटसबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी फडणवीसांवर सडकून टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राज्यात शेवटी कटोरा घेऊन फिरावे लागेल, असे नितीन राऊत म्हणाले आहेत. हे देखील वाचा- आदित्य ठाकरे यांच्याकडून अंतिम वर्षाच्या परीक्षांसदर्भातील UGC च्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल

अमित शाह यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यामांशी संवाद साधला होता. त्यावेळी  ते म्हणाले की, आम्हाला राज्यात अस्थिरता निर्माण करण्याची इच्छा नाही. ही वेळ कोरोना विषाणूशी संघर्ष करण्याची आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार नाही. हे सरकार अंतर्गत विरोधानेच पडेल,” असेही त्यांनी नमूद केले होते. आम्ही महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत अमित शाह यांना माहिती दिली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी वेळही मागितला असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.