एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील वेगवेगळ्या कार्यकर्त्यांचा दसरा मेळावा आटोपून परतीच्या मार्गावर असताना अपघात झाला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Higway) शहापूर जवळ मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसाह हे कार्यकर्ते मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सिल्लोड (Sillod) - सोयगाव (Soygaon) विधानसभा मतदारसंघातील होते. कार्यकर्त्यांची बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताबाबतचा 25 जण जखमी झाले आहेत. महत्त्वाचे असे की, शिंदे गाटातील कार्यकर्त्यांचा केवळ जातानाच नव्हे तर मेळाव्याला परततानाही अपघात झाला होता. ते कार्यकर्ते सांगली जिल्ह्यातील होते.
सिल्लोड (Sillod) - सोयगाव (Soygaon) विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे कार्यकर्ते शिंदे यांचा मेळावा आटोपून परतत होते. या वेळी एक ट्रक आणि बस उड्डाणपुलावरील साईड डिव्हायडर तोडून थेट रस्त्यावर कोसळल्या. ज्यामुळे हा अपघात घडला. दरम्यान,पाठीमागून येणाऱ्या दोन बसही या अपघातामुळे एकमेकांवर आदळल्या. या विचत्र अपघातामुळे काही काळ मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर वाहतूक कोंडी कमी झाली. मात्र, रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर काचा आणि काचांच्या तुकड्याचा खच पडला होता.
दरम्यान, विजयादशी निमित्त आयोजित दसरा मेळाव्याला येत असताना काल (24 ऑक्टोबर) सकाळी सुद्धा शिंदे गाटच्या कार्यकर्त्यांचा अपघात झाला होता. हे कार्यकर्ते सांगली जिल्ह्यातील कवटेमहांकाळ तालुक्यातील रहोते. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिरढोन गावानजीक ही घटना घडली. महामार्गावरुन भरधाव आलेल्या ट्रकने कार्यकर्त्यांच्या वाहनाला पाठिमागून धडक दिली आणि हा अपघात घडला. या अपघातात तिघे जण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, जखमींना तातडीने वैद्यकीय मदत पोहोचविण्यात आली. त्यांच्यावर रुग्णालयात दाखल करुन उपचार करण्यात आले.
विजयादशमी निमित्त कालचा दिवस राजकीय वर्तुळात फारच गरमागरमीचा ठरला. एका बाजूला शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबई येथील आझाद मैदानावर पार पडला. तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेने शिवाजी पार्क मैदानावर म्हणजेच शिवतीर्थावर पार पडला.
दोन्ही गटांनी आपापला मेळावा यशस्वी व्हावा यासाठी ताकद पणाला लावली होती. दोन्ही गटांनी आपापाल्या दसरा मेळाव्यातून परस्परांवर शेलक्या शब्दांमध्ये टीकास्त्र सोडले. दोन्ही मेळाव्याला कार्यकर्त्यांची समाधानकारक गर्दी होती. मात्र,या दोन्ही मेळाव्यातून जनतेला काय मिळाले याबाबत मात्र अद्यापही आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे मोठ्या प्रमाणावर लक्ष लागले होते.