'...तर पाडापाडीचे राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांची नावे जाहीर करेल' एकनाथ खडसे यांच्याकडून गिरीश महाजन यांना इशारा
Eknath Khadse | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि रोहणी खडसे (Rohini Khadse) यांचा पराभव झाला होता. यावर भाजप जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी नाराजी व्यक्त केली होती. पंकजा मुंडे आणि रोहणी खडसे यांना भाजपच्या नेत्यांनी पाडले असल्याचा आरोपही त्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. एकनाथ खडसे यांच्या आरोपाला उत्तर देताना गिरीश महाजन यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पाडापाडीचे राजकारण करणाऱ्या नेत्यांची नावे जाहीर कराच, असे आव्हाने दिले होते. जर प्रेदेशाध्यशांनी परवानगी दिल्यास पाडापाडीचे राजकारण करणाऱ्या नेत्यांची नावे जाहीर करेल, असा इशारा एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना दिला आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यामुळे अधिच भाजपला मोठा धक्का बसला आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. यातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना भाजप नेत्यांनीच पाडले, असे असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. खडसे यांनी बिनधास्तपणे पाडापाडीचे राजकारण केले अशा नेत्यांची नावे जाहीर कराच. गिरीश महाजन यांच्या वकव्यावर संताप व्यक्त करत प्रदेशाध्यशांनी परवानगी दिल्यास त्या नेत्यांची नावे जाहीर करेल, अशा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे. खडसेंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. हे देखील वाचा- ट्विटरवर राज्य चालत नाही; शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांचा नितेश राणे यांना खोचक टोला

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद मिटवण्यासाठी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी केली आहे. एकनाथ खडसे यांची मनधरणी करण्यासाठी शनिवारी जळगावात भाजपची विभागीय समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीत काय निर्णय घेण्यात येतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.