ED Raid in Mumbai: कोविड महामारी काळात मुंबई बीएमसीअंतर्गत कोविड संंटर्समध्ये झालेल्या कथीत घोटाळा (BMC COVID Scam Case) प्रकरणात मुंबईमध्ये ईडीची छापेमारी सुरु आहे. आतापर्यंत 15 पेक्षाही अधिक ठिकाणी इडीची छापेमारी सुरु असल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे ही छापेमारी शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधीत 10 ठिकाणी सुरु असल्याचे समजते. लाईफलाईन कंपनीने कोरोना काळात कोविड सेंटर्सच्या नावाखाली केलेल्या कथीत भ्रष्टाचार प्रकरणी झालेल्या तक्रारीची दखल घेऊन ही कारवाई सुरु असल्याचे वृत्त आहे.
मुंबई महापालिकेचे तत्कारीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल यांच्याही घरी ईडीने छापेमारी सुरु केल्याचे वृत्त आहे. कोविड काळात कोविड सेंटर उभारणीसाठी देण्यात आलेल्या कंत्राट प्रकरणी ईडी चौकशी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. या चौकशीचाच एक भाग म्हणून ही छापेमारी सुरु असल्याचे बोलले जात आहे. याच प्रकरणात मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचीही ईडीने चौकशी केली आहे. (हेही वाचा, Shiv Sena (UBT) March On BMC on July 1: उद्धव ठाकरे यांची घोषणा, Aaditya Thackeray यांच्या नेतृत्वात शिवसेना (UBT) चा मुंबई मनापावर विराट मर्चा)
दरम्यान, शिवसेना (UBT) गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्याही घरी ईडीचे अधिकारी पोहोचले असून, छापेमारी सुरु असल्याचे समजते. सूरज चव्हाण हे शिवसेना (UBT) युवानेते आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. मुंबई महानगरपालिका, राज्यसभा आणि परिषदांच्या निवडणुकांमध्ये सूरज चव्हाण यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.