लॉकडाऊन काळात राज्यात कोविड-19 संदर्भात 1 लाख 23 हजार गुन्ह्यांची नोंद, तर 6 कोटी 54 लाख रुपयांचा दंड; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
Home Minister Anil Deshmukh | (Photo Credits: Facebook Live Screenshot)

लॉकडाऊन काळात राज्यात कोविड-19 संदर्भात 1 लाख 23 हजार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 6 कोटी 54 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. यासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली आहे. राज्यात लॉकडाऊन काळात कलम 188 नुसार 1,23,105 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून 23,845 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच विविध गुन्ह्यांसाठी 6 कोटी 54 लाख 93 हजार 411 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

लॉकडाऊन काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 260 घटना घडल्या आहेत. त्यात 841 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस विभागाच्या 100 नंबरवर लॉकडाऊन काळात 1,00,535 फोन आले असून या सर्वांची योग्य दखल घेण्यात आली आहे. (हेही वाचा - राज्यात मे महिन्यात 76 लाख 83 हजार क्विंटल धान्याचे, तर 62 लाख 84 हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप; छगन भुजबळ यांची माहिती)

याशिवाय आतापर्यंत राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का असणाऱ्या 718 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, लॉकडाऊन काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1330 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 80,163 वाहने जप्त करण्यात आली आहे.