एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्या वडिलांनी हत्या (Murder) करून तिचा मृतदेह कालव्यात फेकून दिला. त्यानंतर वडिलांनी विष प्राशन करून आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. ही घटना शुक्रवारी पहाटे तीन वाजता घडली. संदीप शिंदे असे आरोपीचे नाव असून, तनुश्री शिंदे असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडील ऑटोरिक्षाचालक आहेत. पत्नी वृषाली शिंदे हिच्यासोबतच्या ताणलेल्या संबंधांमुळे ते नाराज होते. मुलगी तिच्या आईकडे राहात होती आणि तिने काही दिवस वडिलांच्या घरी जाण्याचा आग्रह धरला होता.
मुलीची हत्या केल्यानंतर शिंदे यांनी तनुश्रीला सारसबागेजवळील कालव्यात ढकलून विष प्राशन केल्याची माहिती पत्नीला दिली. सध्या ते ससून जनरल हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल आहेत. त्यानंतर वृषालीने स्वारगेट पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांचे 13 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. संदीपच्या दारू पिण्याच्या सवयी आणि संशयामुळे त्यांचे संबंध ताणले गेले होते. हेही वाचा Bareilly Shocker: लग्न समारंभात डान्स फ्लोअरवर नाचण्यावरून झालेला वाद पोहोचला विकोपाला,13 वर्षीय मुलाची हत्या
वृषाली ब्युटी सलून चालवते. वृषाली महिन्याभरापासून आई-वडिलांसोबत राहत होती. तिच्या वडिलांनी संदीपला कायदेशीर नोटीस पाठवली. स्वारगेट पोलिस ठाण्याचे प्रभारी अशोक इंदलकर म्हणाले, कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर संदीप संतापला होता. तो मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याने तनुश्रीला कालव्यावरील सावरकर पुतळ्याजवळ नेले आणि नंतर ढकलून दिले. शोध मोहिमेनंतर दुपारी 2 वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला.
डीसीपी (झोन II) स्मार्तना पाटील म्हणाल्या, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. वडील सध्या रुग्णालयात दाखल आहेत. सध्याचा भाग हा त्यांच्या तणावपूर्ण संबंधांवर आणि काही आर्थिक कारणांचा परिणाम आहे. भारतीय दंड संहिता (IPC) कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.