Dr Indurani Jakhar । Photo Credits: @Neerajmumbai

महाराष्ट्रातील आदिवासी बहुल पालघर जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून डॉ. इंदुराणी जाखर ( Dr. Indurani Jakhar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.बुधवार, 2 एप्रिल दिवशी त्यांनी पदभार स्वीकारताना जाखर यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांना आणि प्रदेशातील विविध लोकसंख्येच्या कल्याणाला प्राधान्य देण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे.

जिल्हाधिकारी म्हणून पालघर मध्ये वाढवन बंदर, रिलायन्स टेक्सटाईल पार्क, मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवे, फ्रेट कॉरिडॉर, बुलेट ट्रेन प्रकल्प आणि विरार-डहाणू उपनगरीय चौपदरीकरण यासह प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी पालघर जिल्ह्याला भेडसावणाऱ्या सामाजिक-आर्थिक विषमता आणि पर्यावरणीय समस्या तसेच आदिवासी समुदायांचा शाश्वत विकास यांवर लक्ष देणार असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान

शिक्षण, आरोग्य आणि पालघरच्या सर्वांगीण विकासावर त्यांचे लक्ष केंद्रित असल्याने, डॉ. इंदुराणी जाखर यांची पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती ही जिल्ह्यासाठी एक महत्त्वाचा अध्याय आहे. प्रमुख आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांचा सक्रिय दृष्टिकोन यामुळे होणार्‍या बदलांकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

कोण  आहेत इंदुराणी जाखर

इंदुराणी जाखर या 2016 च्या बॅचची आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात All India Rank of 30  मिळवला. त्या  मूळच्या हरियाणातील झज्जर येथील आहेत. त्यांचे कुटुंब नंतर दिल्लीत स्थायिक झाले, जिथे त्यांचे वडील दिल्ली पोलिसात कार्यरत होते.