Dombivli Shocker: पत्नीचं सर्व्हिस बूक न दिल्याने पगारवाढ अडकल्याने पती ने केला शाळा मुख्याध्यापकावर चाकू हल्ला; आरोपी अटकेत
Arrests | (Photo credit: archived, edited, representative image)

भिवंडी (Bhiwandi) मध्ये एका बेरोजगार व्यक्तीने शाळेच्या मुख्याध्यापकाला चाकूच्या धाकावर धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी डोंबिवली जीआरपी ने त्याला अटक केली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, मुख्याध्यापकाने आरोपीच्या पत्नीचं सर्व्हिस बूक देण्यास टाळाटाळ केली आणि यामुळे तिला मिळणारा आर्थिक फायदा रोखला गेल्याने त्याने हे पाऊल उचललं असल्याचं समोर आलं आहे. जखमी मुख्याध्यापक भागवत गुरव हे 56 वर्षीय आहेत सध्या त्यांच्यावर कल्याण च्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.

भागवत गुरव हे सरकारी शाळेत मुख्याध्यापक पदावर काम करत आहेत. आरोपी 39 वर्षीय शकील शेख याच्यावर खूनाच्या प्रयत्नाचा आरोप आहे. कलम 307 लावण्यात आल्याची माहिती डोंबिवली जीआरपीचे सिनियर इन्सपेक्टर किरण उंद्रे यांनी टाईम्स ऑफ़ इंडिया शी बोलताना सांगितले आहे.

शकीलने प्रशासनाने दिलेल्या माहितीमध्ये त्याची पत्नी मिनाज चं सर्व्हिस बुकचं काम गुरव यांनी केलं नव्हतं. रिपोर्ट्सनुसार, शकील याने गुरवचा पाठिंबा केला. सोमवारी रेल्वे स्थानकात त्याने गुरव या मुख्यध्यापकांवर हल्ला केला. त्याने डोकं, मान आणि छाती वर वार करून तेथून पळ काढला होता.

गुरव यांना स्टेशन वरील लोकांनीच तातडीने हॉस्पिटल मध्ये दाखल केले. त्यानंतर त्यांची शुद्ध दुसर्‍या दिवशी परत आली. त्यांचा जबाब नोंदवून घेत शकील विरूद्ध तक्रार नोंदवून घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे.