Building Collapses In Dombivli: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली पूर्व परिसरात 40 खोल्यांची तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. अरविंद भाटकर आणि सुनील लोढा अशी मृतांची नावे आहेत. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आदिनारायण नावाची दुर्घटना घडलेली ही इमारत परिसरातील न्यू आयरे रोडवर आहे. तीन मजले मिळून इमारतीत 40 खोल्या होत्या. ही घटना शुक्रवारी (15 सप्टेंबर) दुपारी 4.30 वाजता घडली. मदत आणि बचाव कार्य रात्री उशीर पर्यंत सुरु होते.
अधिक माहिती अशी की, सदर इमारत एकनाथ पाटील यांच्या मालकीची आहे. इमारत धोकादायक अवस्थेत असल्याने भाडेकरुंनी ती खाली केली होती. मात्र, काही कारणांमुळे काही भाडेकरुंना ती रिकामी करता आली नाही. त्यामुळे ते तेथेच राहात होते. ही इमारत कोसळण्याची चिन्हे शुक्रवारी सकाळपासूनच दिसत होती. दुर्घटना घडली तेव्हा मृत झालेले भाटकर आणि लोहिया हे अंथुरणाला खिळलेल्या अवस्थेत इमारतीत झोपले होते.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ठाणे टीडीआरएफचे पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यांनी मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरु करत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काढण्यासाठी इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने लोखंडी रॉड कापण्याचे प्रयत्न सुरू केले. शिवाय ब्रेकर, जेसीपी, पोकलेन मशीन आदींचा वापर करून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम महापालिका प्रशासनाने तातडीने सुरू केले. मतद आणि बचाव कार्य करण्यसाठी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांडगे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी उपस्थित होते.
कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, इमारत कोसळत असल्याचे लक्षात येताच आमचे सहाय्यक आयुक्त आणि इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना बाहेर काढले. मात्र तरीही दोन जण अडकल्याची माहिती पुढे येत आहे.