फोटो सौजन्य- फाइल इमेज

डोंबिवली (Dombivali) येथे राहणाऱ्या एका महिलेला ती घरात भटक्या कुत्र्यांना राहण्यासाठी जागा देते म्हणून तिला मारहाण करण्यात आली. मात्र मारहाण करण्यात आल्यानंतरच्या काही वेळाने तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नगमा शेट्टी असे मृत महिलेचे नाव असून ती डोंबिवलीतील मनपाडा येथे मुलगी सुनीता हिच्यासोबत  राहते. मंगळवारी नगमा हिच्या सोबत चार महिलांनी घरात कुत्रा ठेवते म्हणून भांडण केले. तसेच कुत्रे अनोखळी व्यक्तींना भुंकत असल्याने त्याचा त्रास होत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

नगमा हिच्यासोबत भांडण करण्यासाठी आलेल्या महिलांपैकी एका महिलेने आईला मारहाण केल्याचे सुनिता हिने म्हटले आहे. मारहाण करणाऱ्या महिलेने आईच्या छातीवर जोरात मारल्याचा आरोप सुनीता हिले केला आहे. या प्रकारावर नगमा हिने पोलिसात धाव घेत मारहाण करणाऱ्या महिलांच्या विरोधात तक्रार दाखल करुन घ्यावी अशी पोलिसांना विनवणी केली. यावर पोलिसांनी नगमा हिला रुग्णालयात जाण्यास सांगितले पण ती घरी गेली. मात्र घरी आल्यावर त्याच दिवशी रात्री तिचा मृत्यू झाला.(माटुंगा रेल्वे स्थानकाच्या पुलावर दिवसाढवळ्या महिलांची छेडछाड; किळसवाणा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद)

ANI Tweet:

सुनीता हिने आईला मारहाण केलेल्या महिलांवर हत्येचा आरोप लगावला आहे. पण पोलिसांनी या प्रकरणाची अपघाती मृत्यू झाल्याची नोंद करुन घेतली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी डी.के. चौरे यांनी असे म्हटले आहे की, महिलांच्या विरोधात स्वतंत्रपणे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.