डोंबिवलीतील B-Tech पदवीधर तरुणाने डझनभर महिलांना Matrimonial संकेतस्थळावर लावला चुना
प्रातिनिधिक प्रतिमा | (File photo)

मेट्रिमोनियल संकेतस्थळावर आपण बी-टेक पदवीधर असल्याची माहिती देत आयुष्याचा जोडीदार शोधत असल्याचे सांगत महिलांना तरुणाने चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल सुरेश चव्हाण उर्फ अनुराग चव्हाण याला मेट्रिमोनियल वेबसाइटवर विविध अकाउंट्स तयार करुन महिलांना फसवल्याप्रकरणी अटक केली आहे. आरोपी महिलांना लग्नासाठी आश्वासन देत असल्याचे ही सांगण्यात आले आहे.

चव्हाण याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याने विविध महिलांना फसवल्याचे प्रकार ही उघडकीस आणले. डोंबिवलीत राहणाऱ्या चव्हाण याच्या विरोधात आयपीएस कलम आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट अंतर्गत कारवाई केली आहे.(Bulli Bai App: आरोपी विशाल कुमार झा, श्वेता सिंह आणि मयंक रावत यांचा वांद्रे कोर्टाने फेटाळला जामिन अर्ज)

तक्रारकर्त्या महिलेने असे म्हटले की, चव्हाण याने तिची 2.5 लाखांची फसवणूक केली आहे. त्याने स्वत:ला तो परदेशातील एका खासगी कंपनीत उच्च पदावर कार्यरत असल्याचे सांगितले होते. त्यांनी एकमेकांसोबत मोबाईल क्रमांक शेअर केला आणि तेथे ते बोलू लागले. त्यानंतर आरोपीने पीडितेला म्हटले की, त्याला लग्नाची मागणी घालण्यासाठी मुंबईत यायचे आहे. परंतु माझे डेबिट कार्ड ब्लॉक झाल्याचे कारण त्याने पीडितेला दिले आणि मला तातडीने पैसे हवेत असे सांगितले. त्यामुळे पीडितेने त्याला पैसे पाठवून दिले.

अशाच प्रकारच्या घटनांची तक्रार सायन, वर्सोवा आणि नारपोली पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी असे म्हटले की, चव्हाण हा विविध महिलांकडून पैसे घ्यायचा आणि त्यांची फसवणूक करायचा. आतापर्यंत आमच्याकडे त्याच्या विरोधात 10-12 तक्रारी आल्यात आहे. त्याचसोबत अन्य पीडितांनी सुद्धा समोर येत आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन गुन्हे शाखेचे डीसीपी संग्रामसिंह निशानदार यांनी केले आहे. तर चव्हाण याला अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या घरी पोहचले असता दरवाज्याला बाहेरुन टाळे होते पण तो आतमध्ये असल्याचे पोलिसांनी म्हटले.