उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यासमोर येत धुळे (Shirpur) शिरपूर येथील करवंदनाका येथे आदिवासी कोळी बांधवांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला. कोळी समाज बांधव अचानक ताफ्याच्या समोर आल्याने (Police) पोलिसांनी यांना अडवत ताब्यात घेतले आहे. लोकसभा (dhule) निवडणुकीच्या प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. या दरम्यान (Nandurbar) नंदुरबार लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचार सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे शिरपूरमध्ये आले असताना हा प्रकार घडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2024 मध्ये आदिवासी कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्न आपले सरकार आल्यावर तात्काळ सोडवू; असे आश्वासन दिले होते. मात्र आता 10 वर्षानंतर हे आश्वासन पुर्ण झाले नसल्याचे आदिवासी कोळी बांधवांनी सांगितले. (हेही वाचा - Baramati Loksabha: मतदानादिवशी बारामतीत शरद पवार गटाकडून 28 तक्रारी दाखल, पण दोन तक्रारींची दखल)
10 वर्षानंतरही फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा निषेधार्थ त्यांचा काळे झेंडे दाखवून शिरपुर तालुक्यातील आदिवासी कोळी समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. यावेळी प्रचंड गोंधळ उडाला होता. यानंतर पोलिसांनी या निषेधकर्त्यांना तात्काळ बाजूला करत ताब्यात घेतले आहे.
सध्या राज्यासह देशभरात लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार हा ऐन रंगात आला आहे. यावेळी राज्यकर्त्यांनी पुर्वी दिलेले आश्नासन पुर्ण न करणे हे राज्यकर्त्यांना महागात पडत आहे. आश्वासन पुर्ण करणे यामुळे नागरिकांच्या रागाचा सामना हा राज्यकर्त्यांना करावा लागताना दिसत आहे. विशेष करुन सरकारमधील सरकारला या सर्वांचा मोठा सामना करावा लागत आहे.