Baramati Loksabha: मतदानादिवशी बारामतीत शरद पवार गटाकडून 28 तक्रारी दाखल, पण दोन तक्रारींची दखल
Supriya Sule | Twitter

काल बारामती लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. पण मतदानपेक्षा चर्चा जास्त झाली ती निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीची. बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 28 तक्रारी निवडणूक आयोगाकडे केल्या त्यातील 19 तक्रारी या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केल्या आहेत. पैसे वाटणे, शिविगाळ, EVM मशिनची पूजा, वेल्हे येथील PDCC बँक वेळ संपून देखील उघडी ठेवल्याचे तक्रारीमध्ये उल्लेख आहे..रुपाली चाकणकर यांनी EVM ची पूजा केल्या प्रकरणी तर वेल्हे येथील pdcc बँक वेळ संपून देखील उघडी ठेवल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आली आहे.  19 पैकी 2 तक्रारीची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. (हेही वाचा - Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 54,09 टक्के मतदान; कोल्हापुरात सर्वाधिक, तर बारामतीत सर्वात कमी)

सुप्रिया सुळे यांच्याकडून समोरच्या गटाने आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तक्रारी दाखल केल्या.  बारामती लोकसभा मतदार संघात असे गलिच्छ प्रकार कधी घडले नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे..आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत त्यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.. तर अजित पवारांच्या गटाकडून एकही तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली नसल्याचं अजित पवार गटाचे बारामतीचे प्रचार प्रमुख किरण गुजर यांनी सांगितले.

बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान पार प्रक्रिया पार पडली. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं. बारामती लोकसभा मतदारसंघात 56.07 टक्के मतदान झालं. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कमी झाल्याने उमेदवारांची चिंता वाढली आहे.