Dhule Gangrape: धक्कादायक! धुळ्यात एका विवाहित महिलेवर सलग 15 वर्ष अत्याचार, 2 जणांविरोधात गुन्हा दाखल
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या (Gangrape) घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. या घटनेला महिनाही उटलटा नाही, तोच धुळ्यात (Dhule) एका विवाहित महिलेवर सलग 15 वर्ष बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने स्थानिक पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपींनी पीडिताचा अश्लील व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

टीव्ही9 मराठीने दिलेल्या माहितीनुसार, नाना भदाणे असे मुख्य आरोपीचे नाव आहे. दरम्यान, आरोपीने 2006 साली पीडितावर पहिल्यांदा बलात्कार केला आणि या घटनेचा व्हिडिओ बनवला. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडितावर वारंवार बलात्कार केला. याशिवाय, आरोपीच्या जोडीदारानेही पीडितावर अनेकदा अत्याचार केले. दरम्यान, गेल्या 15 वर्षांपासून सुरु असलेल्या या त्रासाला वैतागून पीडिताने अखेर पोलिसांत धाव घेतली. तसेच तिच्यासोबत घडत असलेला संपूर्ण प्रकार पोलिसांच्या कानावर घातला. पीडिताच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. हे देखील वाचा- Nagpur Crime: नागपूरमध्ये आईच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी 11 वर्षीय मुलीला कौमार्य विकण्याचे दिले आमिष, 3 आरोपी अटकेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलाने एवढे वर्ष आरोपींचा त्रास सहन करायला नको होता. त्यांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल करायला हवी होती. ज्यामुळे आरोपींना आतापर्यंत योग्य ती शिक्षा झाली असते. परंतु, पीडिताने बदनामीच्या भितीने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली नव्हती, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या गुन्ह्यांत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबईतील साकीनाका बलात्काराची घटना ताजी असताना डोंबिवली येथे एका अल्पवयीन मुलीवर सलग आठ महिने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेवर संपूर्ण महाराष्ट्रातून संतापजनक प्रतिक्रिया येत असून याप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशा मागणींनीही जोर धरला आहे.