Dharavi (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (Coronavirus) दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत असून सर्वाधिक कोरोना बाधितांच्या संख्येबाबतीत मुंबई अव्वल स्थानावर आहे. मुंबईत कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केलेल्या धारावी परिसरात कोरोना बाधितांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सद्य घडीला धारावीत एकूण 86 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक असून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.

सद्य स्थितीत राज्यात एकूण 3202 इतके कोरोना कोविड 19 संक्रमित रुग्ण आहेत. त्यापैकी 2708 रुग्ण हे प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. तर, 300 रुग्णांना उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा होऊन त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. Coronavirus: महाराष्ट्रातील COVID-19 संक्रमीत रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी; एका क्लिकवर

ANI चे ट्विट:

दरम्यान, महाराष्ट्रासोबतच देशभरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. भारतातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात 1007 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 23 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात एकूण 13,387 रुग्ण आहेत. त्यापैकी 11201 रुग्णालयात उपचार घेत आहेत. 1749 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 137 जणांचा मृत्यू झाला आहे.