मुंबई: अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांनी मंदिराबाहेरूनच घेतली प्रभादेवीच्या सिद्धीविनायकाचे दर्शन, COVID-19 मुळे आज ऑफलाईन दर्शन बंद
Angarki Chaturthi 2021 (Photo Credits: ANI/Twitter)

आज या वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी (Angarki Sankashti Chaturthi)... त्यामुळे गणेशभक्तांमध्येही विशेष उत्साह आहे. गणेशाच्या दर्शनासाठी लाखो भाविक मंदिराबाहेर रांगा लावून गणपती चरणी डोकं ठेवण्यासाठी येतात. मात्र यंदा कोरोनाच्या प्रार्दुभाव मंदिरावर काही निर्बंध लादले आहेत. यामुळे मुंबईतील जगप्रसिद्ध अशा प्रभादेवीच्या (Prabhadevi) सिद्धीविनायकाचे (Siddhivinayak Temple) ऑफलाईन दर्शन बंद ठेवण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. यामुळे अंगारकी चतुर्थी दिवशी सिद्धीविनायकाचे दर्शन न घेता आल्याने भाविक मंदिराबाहेर उभे राहून सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी आलेले चित्र पाहायला मिळाले.

ANI ने हे फोटोज सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये भाविक मंदिराच्या बाहेर रस्त्यावर उभे राहून सिद्धीविनायकाचे दर्शन घेत असताना दिसत आहे.हेदेखील वाचा- Angarki Chaturthi 2021: अंगारकी चतुर्थीदिवशी मुंबईमधील सिद्धिविनायकाचे ऑफलाईन दर्शन बंद; ऑनलाईन दर्शनाची सोय

पाहा फोटोज

सिद्धीविनायकाचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने घेता येईल. मात्र त्यासाठी काही नियम लागू करण्यात आले आहे. ज्यांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले आहे किंवा ज्यांच्याकडे या रजिस्ट्रेशनचा क्यूआर कोड अशा भाविकांना मंदिरामध्ये गणपतीचे दर्शन घेता येईल. अंगारकी चतुर्थी दिवशी सिद्धीविनायक मंदिरात बाप्पाच्या ऑनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आज बंद ठेवण्यात आले आहे. पुण्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीचे ऑनलाईन दर्शन भाविक ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप किंवा युट्युब माध्यमातून घेऊ शकतात. दरम्यान, ऑनलाईन दर्शन 24 तास उपलब्ध असून भाविकांनी जास्तीत जास्त दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.