Nagpur Winter Session: महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून नंबर दोनवर राहतील. या पार्श्वभूमीवर त्यांना नागपूरचा देवगिरी बंगला (Devgiri Bungalow) देण्यात येत आहे. तर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूर्वीप्रमाणेच विजयगड बंगला देण्यात आला आहे. देवगिरीचा बंगला मंत्रिमंडळातील 2 नंबरच्या व्यक्तीला देण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांना देण्यात आला देवगिरी बंगला -
आतापर्यंत या बंगल्यात देवेंद्र फडणवीस राहत होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळात नंबर 2 कोण असणार याची चर्चा होती. एकनाथ शिंदे यांना देवगिरी बंगला देण्यात आला आहे. यावरून एकनाथ शिंदे हे सरकारमधील नंबर 2 असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा बंगला कॅबिनेटमधील क्रमांक 2 ला देण्यात आला आहे. (हेही वाचा -Reasons of Victory of The Maha Yuti: महायुतीच्या विजयाची कारणे कोणती? उदासीन मतदार, भ्रामक प्रचार?)
देवेंद्र फडणवीस यांना रामगिरी निवास्थान -
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील निवासस्थानाचे नाव रामगिरी असून हिवाळी अधिवेशनापूर्वी येथे तयारी पूर्ण झाली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे रामगिरी हे निवासस्थान होते. आता मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस रामगिरीत राहणार आहेत. 16 तारखेपासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी विधानसभेच्या सचिवालयाने उद्यापासून नागपूरच्या विधानसभेत कामाला सुरुवात केली आहे. (हेही वाचा, Maharashtra Assembly Election Results 2024: विधानसभा निवडणूक निकाल, गिरीश महाजन, कालिदास कोळंबकर, आदिती तटकरे यांच्यासह कोण कोण जिंकले? घ्या जाणून)
14 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी -
तथापी, महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा शपथविधी 14 डिसेंबरला होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. नागपुरात या मंत्र्यांसाठी मंत्री कॉटेज सुसज्ज करण्यात येत आहेत. तसेच अद्याप विरोधी पक्षनेते कोण होणार याबाबत निर्णय झालेला नाही. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याचे निवासस्थानही निश्चित करण्यात आले आहे. तसेच कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेत्यांच्या नावाचे फलक लावायचे आहेत. मंत्र्यांच्या नावाची घोषणा होताच त्यांच्या नावाचे फलक त्यांच्या निवासस्थानाबाहेर लावण्यात येणार आहेत.