Devendra Fadnavis (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोरोनावर (COVID-19) मात केली आहे. तसेच ते पुढील 7 दिवस होम क्वारंटाईन राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयातून (St. George Hospital) घरी परतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी कर्मचाऱ्यांसह सफाई कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. फडणवीस यांना कोरानाची लागण झाल्यानंतर 10 दिवस रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, दहा दिवसानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयाच्या बाहेर येताच फडणवीस यांनी हात जोडून सगळ्यांना अभिवादनही केले आहे.

आज रुग्णालयातून घरी परतलो. सेंट जॉर्ज रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी आणि इतरही सर्व कर्मचारी वृंद यांचा, त्यांनी केलेले सहाय्य, घेतलेली काळजी, उपचार यासाठी मी अत्यंत आभारी आहे. मला लवकर बरे वाटावे, यासाठी ज्यांनी सदिच्छा दिल्या, त्यांचेही अनंत आभार!, अशा आशयाचे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. हे देखील वाचा- Anil Deshmukh On Arnab Goswami Arrest: कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही; पोलिसांची कारवाई कायद्यानेच - महाराष्ट्र गृहमंत्री अनिल देशमुख

देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट-

कोरोनाच्या संकट काळात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान, अनेक कोविड योद्धा कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. मात्र, कोरोनातून बरे झाल्यानंतर ते पुन्हा आपपल्या कामावर रुजू झाले आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्रसह संपूर्ण देशातून यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे.