Devendra Fadnavis | (Photo credit: archived, edited, symbolic images)

विधानससभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर सत्र न्यायालय (Nagpur Court) आवारात जाण्यासाठी आज (20 फेब्रुवारी 2020) मागच्या दाराचा आधार घेतला. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2014 (Maharashtra Assembly Election 2014) मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात फडणवीस यांनी त्यांच्यावर असलेल्या दोन फौजदारी स्वरुपाच्या गुन्ह्यांची माहिती लपविल्याच्या आरोपाबाबत दाखल खटल्याची आज सुनावणी होती. या सुनावणीस हजर राहण्यासाचे फडणवीस यांना न्यायालयाचे आदेश होते. त्यानुसार फडणीस हे नागपूर सत्र न्यायालयात आले होते.

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभेतील विरोधी पक्षनेते असल्याने देवेंद्र फडणीस आणि त्यांच्यावर असलेल्या आरोपांबद्दल प्रसारमाध्यमांसह सर्वसामान्य नागरिकांनाही उत्सुकता आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी फडणवीस हे न्यायालयात उपस्थित राहणार हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना ठाऊ होते. या घटनेचे वार्तंकन करण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनीधी नागपूर सत्र न्यायालयाच्या आवारात पुढच्या (मुख्य) प्रवेशद्वारावर उपस्थित होते. मात्र, फडणवीस यांनी पुढच्या प्रवेशद्वाराने येण्याऐवजी मागच्या दाराने न्यायालयाच्या आवारात प्रवेश केला आणि सर्वांनाच चकवा दिला. एबीपी माझाच्या प्रतिनिधीने वार्तांकनादरम्यान हा प्रसंग सांगितला. अर्थात सुनावणी संपल्यानंत फडणवीस हे स्वत:च प्रसारमाध्यमांना सामोरे गेले आणि सुनावणीबाबत त्यांनी माहिती दिली. (अधिक माहितीसाठी हेही वाचा, निवडणूक प्रतिज्ञापत्र प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना नागपूर कोर्टात जामीन मंजूर )

दरम्यान, नागपूर सत्र न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर देवेंद्र फडणवीस यांना जामीन मंजूर केला आहे. विधानसभा निवडणूक 2014 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्यावर असलेल्या दोन फौजदारी स्वरुपाच्या गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याबाबतच्या खटल्याची सुनावणी नागपूर सत्र न्यायालयात (Nagpur Court) होणार होती. या सुनावणीस हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश असल्याने देवेंद्र फडणवीस हे स्वत: न्यायालयात आले होते.