Devendra Fadnavis On Security: मी प्रदेशाध्यक्ष असताना देखील कधीच सुरक्षा मागितली नव्हती- देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्र सरकारने (State Government) आज एक महत्त्वाचा निर्णय घेत अनेक नेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात केली आहे. यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांसह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर अनेक नेत्यांची सुरक्षा काढून देखील घेण्यात आली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच मिडियासमोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे. मी प्रदेशाध्यक्ष असताना देखील कधीच सुरक्षेची मागणी केली नव्हती असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

"मी मुख्यमंत्री झाल्यावर आणि याकूब मेमनच्या फाशीची शिक्षा आणि इतर घटनांनंतर मला जेव्हा धमक्या मिळाल्या तेव्हा मला ते प्रथमच मिळाले" असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.हेदेखील वाचा- Maharashtra Government Decision: राज ठाकरे यांची झेड सुरक्षा, देवेंद्र फडणवीस यांची बुलेटप्रूफ गाडी हटवली, चंद्रकांत पाटील , प्रसाद लाड यांच्या सुरक्षेतही कपात

राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध व्यक्तिंना देण्यात आलेल्या सुरक्षेबाबतचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयात काहींची सुरक्षा कमी करण्यात आली तर काहींची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. राज्यातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाबाबत आता विरोधी पक्ष काय प्रतिक्रिया देतो याबाबत उत्सुकता आहे.

देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुलगी दिवीजा फडणवीस यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. अमृता फडणवीस यांना पूर्वी वाय दर्जाची सुरक्षा होती. आता त्यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे नेते रामदास आठवले, भाजप आमदार आशिष शेलार, दिपक केसरकर यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला अॅड. उज्ज्वल निकम आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे.