मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे गृहमंत्री देशमुख यांनी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते. या दाव्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. आता हा मुद्दा पकडून विरोधी पक्षाने हल्लाबोल करत अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, राज ठाकरे, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर अशा अनेक नेत्यांनी ट्वीट करत अनिल देशमुख यांच्यावर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस -
#WATCH | "..We demand Home Minister's resignation. If he doesn't then CM must remove him. Impartial probe must be conducted..Letter also states that CM was intimated about this earlier so why didn't he act on it?" says Maharashtra LoP Devendra Fadnavis on Param Bir Singh's letter pic.twitter.com/ue7xWbslDt
— ANI (@ANI) March 20, 2021
चंद्रकांत पाटील -
अब तो स्पष्ट है, ठाकरे सरकार भ्रष्ट है. pic.twitter.com/ZnSZd0QCa1
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 20, 2021
आशिष शेलार -
जगात नावलौकिक असलेल्या मुंबई पोलिसांचा लौकिक धुळीस मिळवून भ्रष्टाचारी पब, पेंग्विन, पार्टी गँगने पोलिसांना “वसूली अधिकारी” बनवले?
पोलिसांच्या बदनामीला ठाकरे सरकार सर्वस्वी जबाबदार!
जनता झुंजतेय कोविडशी,
सरकारची वसूली 100 कोटीची!
ठाकरे सरकारला भ्रष्टाचाराचे "परमवीर!"
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 20, 2021
प्रवीण दरेकर -
ज्यावेळी विधिमंडळात आम्ही हा विषय मांडत होतो, त्यावेळी वाझेंची पाठराखण कोण करत होतं?
खरं तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र पोलिसांची इभ्रत धुळीला मिळविण्याचं काम केलं आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची आवश्यकता आहे. @BJP4Maharashtra#ParamBirsinghLetter pic.twitter.com/e4v6JAIrXV
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) March 20, 2021
अतुल भातखळकर-
स्थानिक प्रकरण दर महा १०० कोटीचे आहे पवार साहेब...
वसुलीवादी काँग्रेस आणि वसूली सेनेचे संयुक्त अभियान.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 20, 2021
राज ठाकरे -
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.
— Raj Thackeray (@RajThackeray) March 20, 2021
पत्रात पुढे म्हटले आहे की, गृहमंत्री म्हणले होते की, मुंबईत 1750 हून अधिक बार, रेस्टॉरंट्स आहेत. प्रत्येकाकडून 2-3 लाख रुपये घेतले तरी महिन्यात 40-50 कोटी जमा होतील. याखेरीज उर्वरित रक्कम इतर ठिकाणाहून वसूल करण्यास सांगितले होते. यावर अनिल देशमुख यांनी, परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला असल्याचे म्हटले आहे.