Baby | Representational image (Photo Credits: pxhere)

Death of Toddler Due to Boiling Water: उकळते पाणी अंगावर पडल्याने एका दीड वर्षाच्या चिमुकली मुलीचा मृत्यू झाल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. ही घटना ६ जुलै रोजी नागपूर जिल्ह्यात घडली. उकळते पाणी अंगावर पडल्याने चिमुकली गंभीर जखमी झाली होती. तीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर काल उपचार सुरु होते. उपचारानंतर रविवारी तीचा मृत्यू झाला. ( हेही वाचा- अंधेरी कुर्ला रोड येथील चाळ कोसळली, बचावकार्य सुरु, तीन महिलांची सुटका)

मिळालेल्या माहितीनुसार, मितांशी मेश्राम असं मृत चिमुकलीचे नाव आहे. मितांशी रुममध्ये खेळत होती त्यानंंतर खेळता खेळता ती बाथरुममध्ये गेली होती. बाथरुममध्ये बाटलीत उकळते पाणी ठेवले होते. उकळते पाणी अंगावर पडले. चिमुकली जोरात किंचाळली, तेवढ्यात आईने धाव घेतला. चिमुकली गंभीर जखमी झाली होती.

तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेले आठ दिवस तिच्यावर उपचार सुरु होते. रविवारी मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर तिच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.