शिवसेनेचा (Shivsena) दसरा मेळावा (Dasara Melava) आणि शिवाजी पार्क (Shivaji Park) हे एक समीकरण बनलं आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिवाजी पार्कमध्ये सभा कोण घेणार यावरून ठाकरे आणि शिंदे गटात जुंपली होती. मात्र आता चित्र स्पष्ट झालं आहे. यंदा उद्धव ठाकरे हेच शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेणार आहेत. आता यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टिका केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, ''आम्ही बाळासाहेबांनी पेरलेले, जपलेले विचार हृदयात घेऊन पुढे निघालोय. विचारांचा वारसा आमच्याकडेच आहे. छाती बडवून रडायला शिवाजी पार्क ही जागा नाही, जिथे बाळासाहेबांना अंगार फुलवला होता तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार?'' (हेही वाचा - Navratri 2023 On Garba, Dandiya: नवरात्री गरबा, दांडीयामध्ये आधार कार्ड पाहून केवळ हिंदूंनाच प्रवेश मिळावा- भाजप आमदार नितेश राणे)
वाचा पोस्ट -
#हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा बुलंद आवाज ज्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी ऐकला, ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला गाडण्याचा विचार मांडला, ज्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर त्यांनी केला, त्याच मैदानातून काँग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा…
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 10, 2023
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा बुलंद आवाज ज्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी ऐकला, ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला गाडण्याचा विचार मांडला, ज्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर त्यांनी केला, त्याच मैदानातून काँग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर, तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही. बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले शिवतीर्थ गेल्याच वर्षी या मंडळींनी बाटवले आहे. आम्ही ठरवले असते तर या मैदानावर सभा घेतलीही असती. परंतु, राज्याचा प्रमुख म्हणून मला कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणायची नव्हती.''असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे.