Mumbai: दहिसर पोलिसांकडून अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त, 6 किलो 560 ग्रॅम चरससह एकास अटक
Arrest | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

मुंबईच्या दहिसर पोलिसांनी (Dahisar Police) अमली पदार्थांचा (Drug) मोठा साठा जप्त केला आहे. दहिसरच्या टोलनाक्याजवळ या मोठ्या कारवाईत एका आरोपीला 6 किलो 560 ग्रॅम चरससह अटक (Arrested) करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या चरसची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1 कोटी 95 लाख आहे. विजय चौहान असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपी विजय चौहान हा यूपीहून मुंबईत चरस विकण्यासाठी आला होता. दहिसरजवळ एक व्यक्ती चरस घेऊन येत असल्याची टीप मुंबई पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दहिसर चेक नाका येथे आरोपीला पकडले.  आरोपीविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेला याबाबत माहिती देताना डीसीपी सोमनाथ घार्गे म्हणाले की, काल एक व्यक्ती दहिसरला ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे कारवाई करत आरोपीला पकडण्यात यश आले आहे. आरोपी विजय चौहान  मुंबईतील मालवणी, मालाड येथे आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. न्यायालयाने आरोपींना 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याशी किती लोक संबंधित आहेत याची मुंबई पोलीस चौकशी करत आहेत. हेही वाचा धक्कादायक! तरुणाला बंदुकीसोबत सेल्फी काढणं पडलं महागात; अचानक ट्रिगर दाबल्याने गमवावा लागला जीव

तो चरस व्यवसायाशी कधीपासून जोडला गेला? पोलीस या सर्व बाबींचा सखोल तपास करत आहेत. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी यूपीतील कानपूर येथून मुंबईत चरस विकण्यासाठी आले होते आणि मुंबईतील मालाड येथील मालवणी परिसरात राहत होते. महिनाभरापूर्वी मुंबईतील दहिसर परिसरातून दोन ड्रग्ज तस्करांना पोलिसांनी अटक केली होती.

त्यांच्याकडून तीन किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला. यापूर्वी वडाळा परिसरात कारवाई करताना 39 लाख 63 हजार रुपयांचे अमली पदार्थ पकडण्यात आले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती.  आरोपींकडून 1 किलो 321 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या एका आरोपीवर दहा गुन्हे दाखल आहेत. इक्बाल शेख आणि जहांगीर खान अशी आरोपींची नावे आहेत.