Cyclone Nisarga: रत्नागिरी किनारपट्टीवर खवळलेल्या समुद्रात अडकलेल्या 10 नाविकांची सुखरुप सुटका
Representational Image (Photo Credits: PTI)

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर ओढावलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा (Nisarga Cyclone) तडखा महाराष्ट्रातील काही प्रदेशांना बसला. रत्नागिरी (Ratnagiri), रायगड (Raigad) भागात आज सकाळपासूनच वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. जोरदार पाऊस आणि उंचच उंच लाटांमुळे एक जहाज भरकटले गेले होते. परंतु, या जहाजावर अडकलेल्या 10 नाविकांची सुखरुप सुटका करण्यात यश आले आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. (निसर्ग चक्रीवादळाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.)

10 नाविक असलेले जहाज रत्नागिरी मिर्या बंदर येथून भरकटले गेले होते. दरम्यान त्यांना किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरु होते. परंतु, उंच लाटा आणि जोरदार पावसामुळे हे जहाज मिरकवाडाच्या दिशेने जात होते. निसर्ग वादळामुळे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती. वाऱ्याच्या जोरदार वेगाने रत्नागिरी, रायगड भागातील काही इमारतींवरील पत्रे उडाले. झाडे उन्मळून पडली.

PTI Tweet:

निसर्ग चक्रीवादळाची लाईव्ह स्थिती येथे पहा:

दरम्यान रत्नागिरी, रायगड नंतर निसर्ग चक्रीवादळाने मुंबईच्या दिशेने कुच केली. मात्र मुंबईवरील निसर्ग वादळाचा धोका टळला असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. परंतु, वाऱ्यांसह पाऊस सुरु राहील अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनापट्टीजवळील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. तर एनडीआरएफच्या तुकड्या धोक्याच्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या.