पुणे पोलिसांच्या Cyber Unit कडून Serum Institute of India ला 1 कोटींचा गंडा घालणार्या टोळींमधील अजून 3 जणांना अटक केली आहे. या टोळीकडून सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला (Aadar Poonawala) असं भासवत कंपनीला 1 कोटीचा गंडा घातला आहे. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी अटक केलेल्यांची संख्या 7 वर पोहचली आहे. अद्यापही या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला, बंडगार्डन पोलिसांनी 1 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिहारमधील चार जणांना अटक केली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
पहा ट्वीट
Maharashtra | The Cyber Unit of Pune City police has arrested 3 accused involved in the case relating to cheating Serum Institute of India posing as CEO Adar Poonawalla. A total of 7 accused arrested till now. Main accused remains absconding: Police pic.twitter.com/jBy5qBj3RO
— ANI (@ANI) November 25, 2022
फसवणूकीचं हे प्रकरण सप्टेंबर महिन्याचे आहे. आरोपींनी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर पूनावाला असे भासवून SII चे एक संचालक सतीश देशपांडे यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये तातडीने पैसे ट्रान्सफर करण्यास सांगणारे व्हॉट्सअॅप मेसेज केले. देशपांडे यांनीही हे मेसेज अदार पूनावाला यांचे असल्याचे मानून, SII च्या वित्त विभागाकडून वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये 1,01,01,554 कोटी रुपयांहून अधिक रक्कम त्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केली. हा सगळा घोटाळा असून आपली फसवणूक झाल्याचे नंतर त्यांच्या लक्षात आले. या घटनेनंतर सतीश देशपांडे यांनी सप्टेंबर 2022 मध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. आतापर्यंत 7 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी SII कडून तक्रार दाखल होताच आयपीसी कलम 419, 420,34 आणि आयटी अॅक्ट अंतर्गत एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने 7 आणि 8 सप्टेंबर रोजी हे व्यवहार केले होते. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करत आरोपींचा सुगावा लावला आहे.