 
                                                                 Navi Mumbai : तुर्भे परिसरात(Turbhe) एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डॉ. सी. वि. सामंत शाळेच्या बाहेर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यांमध्ये मोठा राडा (School Fight) झाला. या राड्यात एकाचा मृत्यू ( minor die )झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आदित्य भोसले असं मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्यांच्यात हा वाद नेमका कशावरुन झाला हे मात्र अद्याप समोर आलेले नाहीये. (हेही वाचा: Navi Mumbai Shocker: दहावी परीक्षेच्या विद्यार्थ्याचं मित्रांकडूनच अपहरण; सिगारेटचे चटके देत मागितली 50 हजारांची खंडणी)
तुर्भे येथील मैदानात बुधवारी दुपारच्या सुमारास बारावीसह इतर वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद झाला होता. विद्यालयातही त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर तो वाद शाळेबाहेर आल्यावर पुन्हा उफाळला. या भांडणात एका गटाच्या 10 ते 15 विद्यार्थ्यांनी दोन विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली. यात दोघेही प्रचंड गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान आदित्यचा मृत्यू झाला. तर, दुसरा मुलगा जिवंत असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेने शाळेतील विद्यार्थ्यांवरही वाईट परिणाम झाला आहे. पालकही या गंभीर घटनेने धास्तावले आहेत.( हेही वाचा:Navi Mumbai Crime: नवी मुंबईत बांधकाम व्यावसायिकाची कार्यलयात घुसून हत्या, पोलिसांत गुन्हा दाखल )
झालेल्या राड्याचे कारण अद्यापह समोर आले नाही पण पोलिसांनी घटनेचा संशयित आरोपी विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात आहेत. मृत ,जखमी आणि आरोपी मुलगा अकरावीचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे. शाळेत दहावीचे पेपर सुरू असताना बाहेर अशा प्रकारे राडा होणे आणि त्यात विद्यार्थ्याचा मृत्यू होणे गंभीरबीब आहे. त्याचा एपीएमसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
