Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

कोरोना विषाणू (Coronavirus) प्रतिबंधक लसीकरण राष्ट्रीय मोहीम अंतर्गत, जास्तीत जास्त लोकांना लस (Covid-19 Vaccine) मिळावी यासाठी खासगी रुग्णालयांना सशुल्क लसीकरणाची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी लस उत्पादकांनी ठरविलेले दर आणि त्यावर लागू होणारे कर हे लक्षात घेऊन केंद्राने कोरोना लसीचे कमाल दर निश्चित केले आहेत. त्यानुसारच खासगी रुग्णालयांनी लसींचे दर आकारण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यापेक्षा जास्त दर आकारल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. लसींच्या ज्यादा दराबाबत लोकांनी complaint.epimumbai@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधावा असे बीएमसीने सांगितले आहे.

राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम हा 16 जानेवारी 2021 पासून बीएमसीच्या क्षेत्रात राबविला जात आहे. मुंबईमध्ये शासकीय तसेच खासगी रुग्णालयातही लसीकरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. सरकारी रुग्णालयात मोफत लस उपलब्ध असून खासगी रुग्णालयात ती सशुल्क मिळत आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार, खासगी लसीकरण केंद्रे लस उत्पादकाकडून लस खरेदी करून लसीकरण करू शकतात. त्यासाठी सरकारने काही दर निश्चित केले आहेत. लस उत्पादकाने दिलेला दर, त्यावर 5 टक्के जीएसटी आणि जास्तीत जास्त 150 रुपये सेवाशुल्क खासगी लसीकरण केंद्रे लाभार्थ्याकडून घेऊ शकतात. (हेही व्सचा मुसळधार पावसामुळे मुंबईतील स्थिती पाहून महापालिकेने लेप्टोस्पायरोसिसबाबत जारी केल्या 'या' महत्त्वाच्या सूचना)

यासाठी निश्चित केलेले दर पुढीलप्रमाणे –

कोविशिल्डः 600+30+150 = 780 रूपये

कोवॅक्सिनः 1200+60+150= 1,410१ रूपये

स्पुतनिक-व्ही: 948+47+150= 1,145 रुपये

लसीकरण केंद्रांना कळवण्यात येत आहे की, नमूद केलेल्या दरानुसारच त्यांनी शुल्क आकारावे. अवाजवी शुल्क आकारल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, मुंबईमध्ये 12 जून रोजी कोव्हॅक्सिन लसीचा केवळ दुसरा डोस उपलब्ध असणार आहे. त्यासाठी पहिल्या डोसचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. तर, कोविशील्ड लसीचा डोस फक्त 45+ लोकांना मिळणार आहे. पहिला डोस 80 टक्के लोकांना व दुसरा डोस 20 टक्के लोकांना. आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस मिळणार आहे.