Uddhav Thackeray | File Photo

महाराष्ट्रात (Maharashtra) कडक निर्बंध करूनही राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत वाढ होत चालली आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत राज्यातील सद्य परिस्थिती व लॉकडाऊनबाबत (Lockdown) सविस्तर चर्चा झाली. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर, सलग 10 किंवा 21 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली आहे. दरम्यान, 'जनतेला समजावू शकतो, पण कोरोनाला समजावू शकत नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी  लॉकडाऊनचे संकते दिले आहेत.

राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते. महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यासाठी अनेक नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना कडक लॉकडाऊन दुसरा पर्याय शोधण्याचा सल्ला दिला आहे. हे देखील वाचा- Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात मागील 24 तासांत आढळले 55,411 नवे कोरोना रुग्ण तर 309 जणांचा मृत्यू

ट्वीट-

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लादले गेले आहेत. त्याबाबतच्या गाइडलाइन्सनुसार, राज्यात सोमवारपासून (5 मार्च) केवळ अत्यावश्यक सेवांसोबत लोकल ट्रेन, बस, टॅक्सी, रिक्षा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, मॉल, दुकाने, सिनेमागृह, नाट्यगृह, ब्युटी पार्लर, केशकर्तनालये, धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात येणार आहेत. याचबरोबर शासकीय कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. खासगी कार्यालयांसाठी वर्क फ्रॉम होम बंधनकारक आहे.