कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना करण्यासाठी देश आणि राज्यभरात लॉकडाऊन (Lockdown) सुरु आहे. त्यामुळे वाहतुकीवर मर्यादा नक्किच येत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची वाहतूक बंद आहे. असे असले तरी लॉकडाऊन काळात शेतमाल वाहतूक करण्यास शेतकऱ्यांना मुभा देण्यात आलेली आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री (Water Resource Minister) जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे. जयंत पाटील यांनी कोरोना व्हायरस संकटामुळे निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर फेसबुक(Facebook) लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते.
या वेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी आपण एकी दाखवायला हवी. ही साखळी मोडायची असेल तर घरात राहण्याशिवाय पर्याय नाही. मला माहिती आहे, परिस्थिती बेताची आहे, तुमच्या मनातही बरेच संभ्रम आहेत. तुमच्या शंकांचे निरसन करायला आम्ही आहोत.
जयंत पाटील यांचे फेसबुक लाईव्ह इथे पाहा
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी सर्व दुकाने सुरु आहेत. त्यामुळे नागरिकांनी वस्तूंचा साठा करु नये. तसेच, कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. राज्यातील डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेऊ नयेत. तसेच नागरिकांनीही गर्दी टाळून सरकार आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे पाटील यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Coronavirus: राज्यातील नागरिकांनी अनधिकृत मार्गाचा वापर करून प्रवास करू नका; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून मांडले 'हे' महत्वाचे मुद्दे)
जयंत पाटील यांचे फेसबुक लाईव्ह इथे पाहा
दरम्यान, आवश्यक असलेल्या एन19 मास्कचे देशात उत्पन्न कमी प्रमाणात होते. त्यामुळे त्याच्या उपलब्धतेवर मर्यादा आहेत. परंतू केंद्र सरकारशी बोलून त्यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सर्व खबरदारी घेतली जात असल्याचेही जयंत पाटील यांनी या वेळी सांगितले.