कोविड 19 (COVID 19) जीव गमावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबाला होणाऱ्या त्रासाची स्वतः दाखल घेत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि पत्र सूचना कार्यालयाने 2020 आणि 2021 मध्ये महामारीत जीव गमावलेल्या पत्रकारांची सविस्तर माहिती गोळा करून त्यांच्या कुटुंबांना पत्रकार कल्याण योजने अंतर्गत मदत देण्याची विशेष मोहीम हाती घेतली.
कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या 26 पत्रकारांच्या कुटुंबांना पत्रकार कल्याण योजने अंतर्गत प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याच्या प्रस्तावाला अमित खरे, सचिव, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिली. 2020-2021 या वर्षांत केंद्र सरकारने, कोविडमुळे मृत्यू झालेल्या 41 पत्रकारांच्या कुटुंबांना अशा प्रकारची मदत केली आहे. आता ही मदत केलेल्या कुटुंबांची संख्या 67 झाली आहे. कोविडमुळे जीव गमावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबांना समितीने सांत्वना दिल्या.
पत्र सूचना कार्यालयाने स्वतःहून कोविड-19 मुळे जीव गमावलेल्या अनेक पत्रकारांच्या कुटुंबांशी संपर्क केला आणि त्यांना योजना आणि दावे दाखल करण्याविषयी मार्गदर्शन केले. समितीने आर्थिक मदतीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांचा त्वरित निपटारा करण्याच्या उद्देशाने पत्रकार कल्याण योजनेची बैठक दर आठवड्याला घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड व्यतिरिक्त अन्य कारणाने मृत्यू झालेल्या 11 पत्रकारांच्या कुटुंबांनी मदतीसाठी केलेले अर्ज देखील समितीने विचारात घेतले आहेत.
पत्र सूचना कार्यालयाचे मुख्य महानिदेशक जगदीप भटनागर, सहसचिव, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, विक्रम सहाय, समितीवरील पत्रकार प्रतिनिधी संतोष ठाकूर, अमित कुमार, उमेश्वर कुमार, सर्जना शर्मा देखील या बैठकीला उपस्थित होते.
पत्रकार कल्याण समिती अंतर्गत पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय आर्थिक मदतीसाठी पत्र सूचना कार्यालयाची वेब साईट https://accreditation.pib.gov.in/jws/default.aspx च्या माध्यमातून अर्ज करू शकतात.