प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : Youtube)

कोरोना व्हायरसमुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. तर महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालये 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र 10 वी आणि 12 वी बोर्ड परिक्षा नियोजित वेळापत्रकानुसार पार पडत आहे. पण पहिली ते नववी च्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेचा प्रश्न उपस्थित राहिला असून त्यावर सरकारकडून लवकरच तोडगा काढण्यात येणार आहे. याच पार्श्वभुमीवर आता शिक्षकांना सुद्धा वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर खासगी कंपन्यांनी सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

गेल्याच आठवड्यात सरकारने राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहिर केली होती. पण शिक्षकांनी कामावर यायचे का असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानंतर शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम करण्यासाठी मागणी केली होती. त्याला आता परवानगी मिळाली असल्याने त्यांना सुद्धा घरुन काम करता येणार आहे. याबाबत शिक्षणायुक्त विशाल सोलंकी यांनी असे म्हटले आहे की, पालकांपेक्षा मुले शिक्षकांसोबत अधिक संपर्कात असतात. त्यामुळेच शिक्षकांना शाळेत बोलावणे अशक्य असून त्यांना मुलांप्रमाणेच घरुन काम करता येणार आहे. ऐवढेच नाही तर शिक्षकांना मुलांचे परिक्षांचे पेपर घरुन तपासता येणार आहेत.(राज्यात बनावट सॅनिटायझर विकणाऱ्यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात- राजेंद्र शिंगणे) 

दुसऱ्या बाजूला ऑफिसात 50 टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचारी आढळल्यास कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यात अजून एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या 42 वर पोहतली आहे. सदर महिलेने फ्रान्स आणि नेदरलॅन्ड्स येथून प्रवास करुन भारतात दाखल झाली होती. याबाबत पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अधिकृत माहिती दिली आहे. तसेच भारतात कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा आकडा 140 च्या पार गेला आहे. यापैकी दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्र येथे कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.