Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्र राज्यावरील कोरोना व्हायरसचे सावट अधिक दाट होत चालले आहे.  134 नव्या रुग्णांसह महाराष्ट्र राज्याचा कोरोना बाधितांचा आकडा 1895 वर पोहचला आहे. यात मुंबई (Mumbai) 113, रायगड (Raigad), अमरावती (Amravati), भिवंडी (Bhiwandi), पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथे प्रत्येकी 1, पुणे (Pune ) 4, मिरा भाईंदर (Mira Bhayandar) 7 आणि नवी मुंबई (Navi Mumbai), ठाणे (Thane), वसई विरार (Vasai Virar) येथे प्रत्येकी 2 रुग्णांचा समावेश आहे. अशी माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने (Health Department) दिली आहे.

कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी सरकार कडक नियमांची अंमलबजावणी करत आहे. महाराष्ट्र राज्यात सातत्याने वाढत असणारी रुग्णसंख्या लक्षात घेत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 21 दिवसांसाठी घेण्यात आलेला लॉकडाऊन  पुढे 2 आठवड्यांसाठी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य किमान 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. लॉकडाऊनच्या या पुढील टप्प्यात नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास लॉकडाऊन वाढवावा लागणार नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. (कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनुसार Red, Orange, Green झोन मध्ये महाराष्ट्र राज्याची विभागणी; तुमचा जिल्हा कोणत्या झोन मध्ये येतो जाणून घ्या)

ANI Tweet:

महाराष्ट्रासह देशातही कोरोना बाधितांचा आकडा वाढू लागला आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना व्हायरसचे 909 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 34 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. या नव्या रुग्णांसह देशातील कोरोना बाधित नागरिकांची संख्या 8356 इतकी झाली आहे.