Anil Deshmukh | Photo Credits: Twitter

कोरोना व्हायरस (Coronavirus) सारख्या संकटकाळात सुद्धा हव्यासापोटी मास्क चा काळाबाजार करणाऱ्या चौघांना मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अंधेरी (Andheri) आणि भिवंडी (Bhiwandi) या भागात एका गोदामात पोलिसांनी तब्ब्ल 25 लाख मास्क जप्त केले आहेत, यापैकी 3 लाख मास्क हे N95 प्रकारातील आहेत, या सर्व मास्कची एकूण किंमत तब्बल 15 कोटींच्या घरात आहेत. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) विशेष पथकाने हे प्रकरण उघड केले असून अशा प्रकारे कोरोना सारख्या आपत्ती काळात जीवनावश्यक वस्तूचा काळाबाजार करण्यासाठी अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या नातंर्गत चौघांना अटक करण्यात आली आहे, याशिवाय दोन जण हे सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याविषयी महाराष्ट्र राज्य गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी माहिती दिली.

Coronavirus: हॅन्ड सॅनिटायझर, मास्क मिळत नसतील तर 'या' क्रमांकावर करा तक्रार; केंद्र सरकार करणार कडक कारवाई

प्राप्त माहितीनुसार, मुंबई पोलिसानी अंधेरी आणि भिवंडी येथील संबंधित गोदामांवर छापा टाकून हा सर्व माल जप्त केला आहे. कोरोनचे संकट फैलावत जात असताना मास्क सारख्या त्याविषयक वस्तूची साठेबाजी करू नये अन्यथा संबधितांबर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. हा प्रकार समाजकंटक आहे, संकटाच्या काळात अशी वागणूक अपेक्षित नाही असेही अजित पवार यांनी आपल्या ट्विट मध्य म्हंटले होते.

ANI ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रात सद्य घडीला एकूण 101 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, सातारा आणि पुणे येथून आज नवीन दोन रुग्ण समोर आले, या सर्व रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय विभाग रात्रंदिवस काम करत आहे, मात्र अशावेळी केवळ नफ्याचा विचार करून काळाबाजार किंवा साठेबाजी करणे हे नक्कीच निंदनीय आहे. यापूर्वी सुद्धा हॅन्ड सॅनिटायझर्स आणि मास्कची साठेबाजी करणारी टोळी पोलिसांकडून गजाआड करण्यात आली होती. मात्र अजूनही परिस्थिती बदलत नाहीये असेच म्हणावे लागेल.