Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून आतापर्यंत 900 च्या पार रुग्णांचा आकडा गेला आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 150 च्या पार गेला आहे. राज्यात कोरोना व्हायरसमुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या 6 पैकी 4 जण हे मुंबईतील असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत. तसेच लॉकडाउनच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर येत्या 1 एप्रिल पासून नागरिकांना कोरोना व्हायरससंबंधित उपचार घेण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा वापर करता येणार आहे. याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

विविध उपचार घेण्यासाठी नगरिकांना सरकारच्या योजनांचा लाभ घेता येतो. त्यापैकीच एक असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोना व्हायरससंबंधित उपचार घेता येणार आहे. ही सुविधा नागरिकांसाठी येत्या 1 एप्रिल पासून लागू करण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचे संकट दूर करण्यासाठी सरकार सक्षम असल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलेल्या गरीब कल्याण योजना अंतर्गत या पॅकेज अंतर्गत सुमारे 8 श्रेणी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार गरीब विधवा-पेंशनर्स-दिव्यांग, जनधन योजना-उज्ज्वला स्कीम, सेल्फ हेल्प ग्रुप (वुमन), ऑर्गनाइज्ड सेक्टर वर्कर्स यांना EPFO च्या माध्यमातून, कंस्ट्रक्शन वर्कर्स आदींनाही या पॅकेजचा लाभ मिळणार आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या दरम्यान 1,70000 कोटी रुपयांचे खास पॅकेज केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.